Saturday, January 25, 2025

बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार, नगर तालुक्यातील तरूणाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर -बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील एका उपनगरात राहत असलेल्या पीडित तरूणीने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुखदेव दिवटे (वय 34 रा. जय भवानी चौक, निंबळक, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सदरची घटना जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2024 पर्यंत नवनागापूर व केडगाव उपनगरात वेळोवेळी घडली आहे. पीडित तरूणीने 12 डिसेंबर 2024 रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. अनिल दिवटे याची फिर्यादी तरूणीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने सुरूवातीला जानेवारी 2018 मध्ये तिच्यासोबत बळजबरीने शारीरीक संबंध केले होते.

सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर मी तुझी बदनामी करेल तसेच जीवे मारेल अशी धमकी दिली होती. त्यानंतर अनिलने वारंवार बदनामी करण्याची धमकी देत फिर्यादीसोबत जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2024 पर्यंत बळजबरीने शारीरीक संबंध केले. तसेच फिर्यादीने त्याला विरोध केला असता तिला शिवीगाळ करून मारहाण केली होती, असे फिर्यादीत नमूद केलेले आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार फिर्यादीने 12 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles