Sunday, September 15, 2024

अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार , नगर शहरात तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर -ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याचे ठरल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या संशयित तरुणाविरूध्द अत्याचार, पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश देवीदास खरमाळे (रा. भाळवणी, ता. पारनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, सदरची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली असल्याने सदरचा गुन्हा तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. श्रीगोंदा येथील अल्पवयीन मुलीची तिच्या मामाच्या साखरपुड्यामध्ये ऋषिकेश सोबत ओळख झाली होती. ते दोघे फोनवर बोलत होते. त्यांच्यात मैत्री झाली व त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

त्यांच्यातील संबंध नातेवाईकांना समजल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी ऋषीकेशच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. लग्नाबाबत बोलणी केली असता ऋषीकेशच्या घरच्यांनी लग्न करण्यास होकार दिला होता. 20 जून 2024 रोजी ऋषीकेश मुलीला भेटण्यासाठी श्रीगोंदा येथे गेला व तिला दुचाकीवरून दाट झाडेझुडुपे असलेल्या ठिकाणी नेले. लग्न जमलेले आहे असे म्हणून त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

पीडिताला राग आल्याने तिने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. 11 ऑगस्ट रोजी ऋषीकेशने पीडिताला फोन करून, ‘तु माझ्याशी फोनवर बोलली नाही तर मी तुझे माझ्याकडे असलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. सोमवार, 26 ऑगस्ट रोजी ऋषीकेश याने पीडिताच्या मामाला फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने नातेवाईकांसह येथील तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तो तपासकामी श्रीगोंदा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles