अहमदनगर – सक्कर चौकातील हॉटेल उदयनराजे पॅलेसच्या वेटरला धमकावल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या सह चौघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रिन्सकुमार हरीनारायण सिंग याने फिर्याद दिली आहे.
त्यात म्हंटले आहे की, आपण यापूर्वी यश पॅलेस हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होतो. परंतु ६ महिन्यापूर्वी आपण ते काम सोडले असून सध्या हॉटेल उदयनराजे पॅलेस मध्ये काम करत आहोत. याचा राग मनात धरून हॉटेल यश पॅलेसचा व्यवस्थापक राकेश सिंग याने मोबाईल वर फोन करून तू उदयनराजे हॉटेलवर कामाला का गेला, असे म्हणत शिवीगाळ केली.
तसेच पुन्हा वारंवार फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्याच फोन वरून शशिकांत गाडे, रमाकांत गाडे, युवराज गाडे यांनीही शिवीगाळ करत तू नगर सोडून जा अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.