अहमदनगर-चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगिरी महाराजांच्या समर्थांचा काल नगर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यामध्ये राणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सभेचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.