पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अहमदनगर मध्ये गणेश विसर्जनाच्या सायंकाळी उपनगर भागात पाईपलाईन रोड येथे एकदंत मित्र मंडळ व मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. परवानगी नसताना कार्यक्रम सादरीकरण केल्याप्रकरणी गौतमी पाटील, स्वीय सहाय्यक अशोक खरात, आयोजक राहुल सांगळे, आनंद नाकाडे, हर्षल भागवत या सर्वांवर अहमदनगर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कलम 188, 283, 341 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम व ध्वनी प्रदूषण अधिनियम कलमानुसार अहमदनगर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आज शुक्रवारी पोलीस कर्मचारी तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात.