Friday, February 7, 2025

Ahmednagar crime: विवाहितेला मारहाण; नवर्‍यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर-मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी त्याच्या जन्माचा दाखला मिळावा यासाठी सासरी जाऊन तो मागितला असता त्याचा राग येऊन आरोपी सासरा भानुदास लक्ष्मण मांजरे, सासू सुमन भानुदास मांजरे, मारुती भानुदास मांजरे, सुरेखा मारुती मांजरे, नवरा कैलास भानुदास मांजरे यांनी एकत्र येऊन तीस शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कोपरगाव पोलिसांत पायल कैलास मांजरे हिने गुन्हा दाखल केला आहे.

पायलचे नवरा आणि सासरच्या मंडळींचे काही कारणावरून वाद आहेत. याबाबत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल असून न्यायालयातून ती काही दिवसांपूर्वी सासरी आली होती. मात्र काही दिवस ती सासरी नांदली. पुन्हा त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ती पुन्हा माहेरी गेली होती. या जोडप्यास एक अपत्य असून त्यास शाळेत घालण्यासाठी पायल या अपत्याचा शाळेचा दाखला आणण्यासाठी सासरी गेली होती. तिने आपल्या मुलाचा दाखला मागितला असता सासरच्या मंडळींना राग आला.

आरोपी सासरा भानुदास लक्ष्मण मांजरे, सासू सुमन भानुदास मांजरे, मारुती भानुदास मांजरे, सुरेखा मारुती मांजरे, नवरा कैलास भानुदास मांजरे आदीनी एकत्र येऊन पायल हिला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाने ती घाबरून जाऊन तिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.195/2024 भा.द.वि. कलम143,147,148,149,324,323504,506,म.पो.कायदा कलम 37 (1) (3)135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आंधळे करत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles