Saturday, March 22, 2025

Ahmednagar news: ग्रामपंचायत निवडणुक…महिलेचा विनयभंग चार जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची फिर्याद पाथर्डी पोलीस स्टेशनला संबंधित महिलेने दाखल केली असून या संदर्भात करंजी येथील चार जणांविरोधात मारहाणीसह विनयभंग केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत संबंधित महिलेने पाथर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बूधवार (दि.15) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करंजी येथील आबासाहेब उत्तम अकोलकर, महादेव रंगनाथ अकोलकर, अमोल उद्धव अकोलकर व नितीन साहेबराव अकोलकर हे पिडीत महिलेच्या घरी गेले होते.

‘तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या विरुद्ध मतदान का केले?’ असे म्हणत शिवीगाळ करू लागले त्यावेळी पिडीतेची सासू चंद्रकला व सासरे विष्णू दानवे हे त्यांना समजावून सांगत असताना महादेव रंगनाथ अकोलकर व अमोल उद्धव अकोलकर यांनी शिवीगाळ करून मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर आबासाहेब उत्तम अकोलकर याने पिडीतेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत मारहाण केली.घरापासून निघून जात असताना दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद संबंधित महिलेने पाथर्डी पोलिसात दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles