नगर-नाजूक कारणातून सहा जणांनी विवाहितेचे नगरमधून अपहरण करून तिला धानोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथे एक दिवस डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात अपहरण,मारहाण आदी कलमांन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला. कालिंदा भाऊसाहेब साबळे (रा.झोपडी कँन्टींग, नगर), मालन बाळासाहेब गायकवाड (रा. सुलेमान देवळा ता. आष्टी, जि. बीड),सुलोचना दत्तात्रय गाडे (रा. दादेगावता. आष्टी, जि. बीड), पोपट अबाजी खुडे (रा. केडगाव, नगर), प्रशांत आबाजी खुडे, भीमराव श्रावण अढागळे (दोघे रा. धानोरा, ता. आष्टी,जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी विवाहिता मुळच्या श्रीगोंदा
तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून, सध्या सावेडी उपनगरात भाडोत्री बंगल्यात त्या एकट्याच राहतात. त्यांचे पती कामानिमित्त मुंबई येथे व दोन मुली वडिलांकडे आष्टी तालुक्यातील एका गावात राहतात. फिर्यादी नगरमध्ये एका ठिकाणी मजुरीचे काम करतात. त्या सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्या सध्या राहत असलेल्या ठिकाणी सावेडी उपनगरात होत्या. त्यावेळी तेथे कालीदा साबळे, माल्न गायकवाड, सुलोच नागाडे, पोपट खुडे, प्रशांत खुडे, भिमराव अढागळे असे सर्व जण आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाणकेली.रिक्षातून नगर शहरातील चांदणी चौक येथे व तेथून टेम्पोतून धानोरा येथे नेले. तेथे गेल्यानंतर सर्वांनी पुन्हा मारहाण केली व भीमराव अढागळे याच्या घरात बळजबरीने डांबून ठेवले.मंगळवारी दुपारी दोन वाजता कालींदा साबळे हिने फिर्यादीला घराच्या बाहेर काढून नगर येथे माळीवाडा बस स्थानकावर आणले. त्यानंतर फिर्यादी तोफखाना पोलिस ठाण्यात आल्या व त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी सायंकाळी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक सहायक जे.सी.मुजावर करीत आहेत.