अहमदनगर (प्रतिनिधी) – तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. संकेत सतिष अंकाराम (रा. दिल्लीगेट, तोफखाना) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
फिर्यादी तरूणी नगर शहरात राहते. तिच्या मित्राचे सावेडीतील प्रोफेसर चौक येथे मोबाईलचे दुकान आहे. त्या दुकानात काम करणार्या संकेत अंकाराम सोबत तरूणीची सहा ते सात महिन्यापूर्वी ओळख झाली होती. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून ते एकमेकांना भेटत होते.
दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी तरूणी तिच्या घरी असताना तिला संकेतचा फोन आला व त्याने कामानिमित्त भेटायचे असल्याचे सांगितले. तरूणी घरी एकटीच असल्याचे त्याला समजल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी घरी आला व त्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार संकेत तरूणीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत होता.
दरम्यान दि.१५ मे २०२४ रोजी संकेतने तरूणीसोबत संबंध ठेवले असता तिने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर त्याने बघु नंतर असे म्हणाला. वारंवार लग्नाबाबत विचारणा करून देखील संकेतने तरूणीला नकार दिल्याने शेवटी तिने संकेत विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.