नगर- आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून मेडिकलचे शिक्षण घेणार्या तरूणाकडून २ लाख९० हजार रूपये घेतले. नोकरी दिली नाही व घेतलेले पैसेही परत दिले नाही. आपली फसवणूकझाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला. अर्ज चौकशीनंतरकोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूकीचागुन्हा दाखल झाला आहे. सागरभरत मगर (वय २५, रा. देऊळगाव घाट ता. आष्टी, जि. बीड) असे फसवणूक झालेल्यातरूणाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गौरव दादासाहेब नरवडे (रा. खातगाव टाकळी ता.नगर) व प्रवीण तान्हाजी राडे (रा. मुंबई, पूर्ण पत्ता माहितीनाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मगर हे नगर शहरातील एकाकॉलेज मध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असून त्यांची गौरव नरवडे याच्याशी ओळख आहे. दि.८ जून २०२२ रोजी नरवडे हा मगर यांच्याकडे आला व म्हणाला, ‘माझी ओळख मंत्रालयातील प्रवीण तान्हाजी राडे यांच्याशी असून त्यांच्या सोबतमाझे बोलणे झाले असून माझ्या बरोबर तुलाही अरोग्य विभागात नोकरील लावून देतो,’ असे सांगितले. ८ जूनरोजी मगर व नरवडे हे दोघे राडे याला नगर शहरातील सक्कर चौकातील हॉटेल उदयनराजे येथेभेटले. त्यावेळी राडे याने मगर यांना सांगितले,‘मी मंत्रालयात कामाला असून मी अनेक लोकांचेकामे नेहमी करत असतो, माझी सर्व मंत्र्याशी ओळख आहे, तुमचे दोघांचे काम मी ताबडतोब करून देतो, तुम्ही मला५ लाख रूपये द्या, मी गौरव नरवडे यांच्याशी चर्चा करून तुम्हालासांगेन व माझे सर्व पैसे गौरव नरवडे यांच्याकडे जमा करा’, असेसांगितले.मगरयांनी त्यावर विश्वास ठेऊन दि. १० ते २३ जुलै २०२२ या कालावधीत १ लाख ५० हजार रूपये ऑनलाईनव १ लाख ४० हजार रूपये रोख स्वरूपात असे एकुण २ लाख ९० हजार रूपये नरवडे याला दिले.नरवडे याने राडे याच्या खात्यावर पैसे पाठविले. काही दिवसांनी नरवडे व राडे यांच्याशीसंपर्क करून नोकरीबाबत विचारणा केली असता, तुम्ही या नोकरी साठीपात्र नाहीत. तुमची कागदपत्रे कमी आहेत अशी उडवा उडवीची उत्तरेदेत मगर यांना नोकरीला न लावता व घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीतम्हटले आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार बडे करीत आहेत.
अहमदनगरमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणूक,मंत्रालयातील कर्मचाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल
- Advertisement -