Monday, April 22, 2024

अहमदनगर जिल्ह्यात मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर- दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांनाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण (रा. गरडाचे पाटोदा ता. जामखेड) हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे (रा.जामखेड) हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा गरडाचे) याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.
याचाच मनात राग धरून दि ३ मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles