Saturday, October 5, 2024

नगर शहरात मामाच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले, गुन्हा दाखल

नगर शहरातील वाकोडी रस्त्यावर राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीला (वय १५) पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी एकच्या दरम्यान घडली. मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने तिच्या आईने कोतवाली पोलिसात मंगळवारी (दि.६) धाव घेत फिर्याद दिली.

दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील भाचावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे पती सोमवारी सकाळी कामावर गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी घरीच होती. मुलीचे सराव पेपर सुरू असल्याने ती पेपरसाठी शाळेत जाणार होती. दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी यांना शाळेतील शिक्षकाने फोन करून मुलगी पेपरसाठी आली नसल्याची माहिती दिली. फिर्यादी यांनी पतीला मुलगी शाळेत गेली नसल्याचे कळविले. ते दोघे कामावरून घरी आले व त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

मग त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांचा भाचाचा मोबाईल बंद लागला. सुमारे दीड महिन्यापूर्वी भाचाने मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने भाचानेच मुलीला पळवून नेले असल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली. कोतवाली पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles