Thursday, July 25, 2024

Ahmednagar crime : युवकाला मारहाण व जिवे मारण्याची धमकी चौघांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर-चौघांच्या टोळक्याने युवकाला शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना भिंगारच्या शुक्रवार बाजार परिसरातील शनि मंदिराजवळ घडली. यश सचिन भिंगारदिवे (वय 18 रा. सदर बाजार, भिंगार) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलमानुसार चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निग्रो (पूर्ण नाव नाही), शाहीद शेख, खुदाबक्ष (पूर्ण नाव नाही) व एक अनोळखी (सर्व रा. सदर बाजार, भिंगार) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना मंगळवारी (2 जुलै) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली असून बुधवारी (3 जुलै) कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यश भिंगारदिवे मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास शुक्रवार बाजार येथील शनि मंदिराजवळ असताना चौघे संशयित आरोपी तेथे आले व ‘तू यश आहे का’, असे म्हणून त्यांनी काही एक न विचारता यशला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत यश जखमी झाला असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रवी टकले करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles