अहमदनगर -एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांचा एकत्र आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवल्याचा प्रकार नगर तालुक्यातील दरेवाडी गावात घडला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखविण्याच्या कलमानुसार संबंधित तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिराज चाँद सय्यद (रा. दरेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लहु सूर्यभान बेरड (वय 39 रा. हरिकृष्ण नगर, दरेवाडी) यांनी बुधवारी (2 ऑक्टोबर) साडेनऊच्या सुमारास फिर्याद दिली आहे. शिराज चाँद सय्यद याने बुधवारी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांचा एकत्र आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला. सदरचा व्हिडीओ लहु सूर्यभान बेरड यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता पाहिला. तो पाहून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. बेरड यांनी हा प्रकार भिंगार कॅम्प पोलिसांना सांगितला. पोलिसांनी बेरड यांच्या फिर्यादीवरून सय्यद विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार आर. बी. टकले करत आहेत.