अहमदनगर -शहरातील निलक्रांती चौक येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम गीतांचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात भीम गीता ऐवजी दुसरे गाणे लावायच्या कारणावरून माजी नगरसेवक अजय साळवे यांचा मुलगा व विजय पठारे यांच्या कार्यकत्यात शब्दिक चकमक झाली यांचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले यावेळी पठारे यांचे पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी राडा सुरु केला खुर्च्याची फेकाफेकी झाली या हाणामारीत दोन्ही गटाचे पाच जखमी झाले यावेळी जाड टनक हत्याराचा वापर झाल्याने दोन गंभीर जखमी झाले
घटनेची माहिती समजताच उपअधीक्षक भारती व तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी पदभार असलेले निरीक्षक दराडे हे पोलीस पाठकासह घटनास्थळी हजर झाले. जखमीना रुग्णालयात पाठविले व जमाव शांत केला.जखमी विजय पठारे याने औषधपचार सुरु असतानाही डॉक्टर पोलीस व कर्मचारी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेप्रकरणी साळवे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विजय पठारेशह पंधरा जणांविरुद्ध, जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगल घडून आणणे व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील फुटेज पाहून आरोपीची धर पकड सुरु केली आहे.