अहमदनगर : पाठीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) घडली. संतोष साळवे (पूर्ण नाव माहीत नाही, रा.सांगळेगल्ली, ता. नगर) असे गुन्हा
दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. सोमवारी फिर्यादी महिलेला पाठीचा त्रास होऊ लागला.त्यामुळे सदर महिला दवाखान्यात गेली असता आरोपीने त्यांना टेबलावर झोपण्यास सांगितले. आरोपी याने महिलेची तपासणी करत असताना गैरकृत्य केले. तसेच तू मला फार आवडतेस. आपल्यात काय झाले ते कुणालाही सांगू नको, नाही तर तुझ्याकडे पाहतो, अशी धमकी दिली