Tuesday, February 27, 2024

नगरमधील नामांकित महाविद्यालयातील शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) – ‘प्रॅक्टीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल, असे म्हणून शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर शहरातील एका महाविद्यालयात सदरची घटना घडली असून याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीष शिर्के (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरात राहत असून एका महाविद्यालयात शिक्षण घेते. अखेर त्या शिक्षकाच्या विरोधात शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

शहराच्या उपनगरी भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. ती तारकपूर भागातील एका महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. शिर्के भूगोलाचे शिक्षक आहेत. तिने फिर्यादित म्हटले आहे की ५ फेब्रुवारीला प्रा. शिर्के यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परिक्षेत २० पैकी २० गुण हवे असतील तर मला काय देशील? अशी विचारणा केली. तेव्हा मी विषय टाळून तेथून निघून गेले.

त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात भेटल्यानंतरही प्रा. शिर्के तशीच मागणी करीत राहिले. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्यांनी शून्य गुण दिले. त्यामुळे ८ फेब्रुवारीला मी त्यांना त्यासंबंधी विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करीत पुन्हा तशीच मागणी केली. माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतून ओळखून मी तेथून निघून गेले.

मी घाबरलेले असल्याने व बदनामी होईल म्हणून त्या दिवशी घरी कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्या मुलीने कुटुंबीयांसोबत शुक्रवारी (दि.९) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी शिक्षका विरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४, ५०६ सह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास त्यास अटक केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles