Monday, April 22, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाने शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करून तिला जीवन मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे एक महिला शेतात काम करीत होती येथील रहिवासी व माळेगाव भडके वस्ती येथील प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक संतोष अशोक अकोलकर हे शेतात काम करणाऱ्या महिलेजवळ गेले तुझ्या पतीने माझ्या माझ्या बायकोच्या विरोधात ती काम करीत असलेला संस्थेकडे अर्ज करून माझ्या बायकोची करंजी येथुन बदली केली. त्यास तुझा पतीच जबाबदार आहे असे म्हणत विनयभंग केला तिला शिवीगाळ केली जिवे मारण्याची धमकी दिली महिलेने आरडा ओरड करत असते शिक्षकाने तेथून पळ काढल्याने महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून शिक्षक संतोष अशोक अकोलकर यांच्या विरोधात 354 ,323, 504, 505, अन्वये गुन्हा दाखल झाला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles