Tuesday, April 23, 2024

अहमदनगर शहरात तरुणांवर धारदार शस्राने वार, गुन्हा दाखल

अहमदनगर-मित्रांच्या वाढदिवसाला गेलेल्या तरुणांवर धारदार शस्राने वार केल्याचे घटनेने पुन्हा शहर हादरले आहे. सचिन मुरलीधर ठाणगे (वय २९ रा. दातरंगे
मळा) असे जखमी तरूणाचे नाव आहे.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ओमरत्न भिंगारदिवे (रा. वारूळाचा मारूती), राहुल रोहकले (रा. रोहकले गल्ली, नालेगाव), गणेश भुजबळ (रा. दातरंगे मळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रांच्या वाढदिवसाला जखमी सचिन ठाणगे मित्र अमित चित्राल व निखिल भिसे यांच्यासह वारूळाचा मारूती कमानीजवळ गेले होते. यावेळी ओमरत्न, राहुल व गणेश हे तिघे तेथे होते. दरम्यान फिर्यादी सचिन ठाणगे आणि त्यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाले.

त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणी मध्ये झाले. दरम्यान मारहाणीमध्ये आरोपींनी धारदार शस्राने सचिन वर हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles