Thursday, January 23, 2025

नगर शहरातील शिक्षिकेवर अत्याचार तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर शहरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करणार्‍या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बांधकामाच्या साईटवर व इतर ठिकाणी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी करण भगवान राजपाल (रा. भिंगार, अहिल्यानगर) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने बुधवारी (4 डिसेंबर) फिर्याद दिली आहे.
सन 2022 मध्ये फिर्यादीची इंस्टाग्रामवर करण सोबत ओळख झाली होती. त्याने 8 मे 2022 रोजी फिर्यादीला फोन करून आपल्याला फिरण्यासाठी जायचे असे सांगितले. तो फिर्यादीला घेण्यासाठी आला. त्याने फिर्यादीला त्याच्या सोबत घेऊन जात डिमार्ट बिल्डिंगच्या मागील एका कन्स्ट्रक्शन साईटवर नेले. तेथे त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही त्याने 3 नोव्हेंबर 2024 रोजी शहराजवळील एका डोंगर परिसरात नेऊन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले. त्यानंतर त्याने पीडितासोबत बोलणे बंद केले.

तेव्हा पीडिताने त्याला 12 नोव्हेंबर रोजी लग्न करण्यासंदर्भात विचारणा केली असता त्यानंतर पीडितेस त्याने लग्न करायला नकार दिला. तुला काय करायचे ते कर, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तु जर माझी तक्रार केली तर मी तुझे फोटो व्हायरल करेल,अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles