गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा आहे. ती तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकत असते. गावोगावी शहरोशहरी तिचे अनेकदा कार्यक्रम आयोजित केले जातात. गौतमीची लोकप्रियता एवढी वाढली आहे की लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वच तिचे चाहते आहे. तरुणाईला तर तिचे वेड लागले आहे. गौतमीचा डान्स बघण्यासाठी लोक आवडीने तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. तिच्या कार्यक्रमातील असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलचा डान्स नाही तर एका चिमुकल्याचा डान्स चर्चेचा विषय ठरलाय. एक चिमुकला तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये उभा राहून मनसोक्त नाचताना दिसत आहे. त्याचा हा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला प्रेक्षकांमध्ये उभा राहून भन्नाट डान्स करत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गौतमी पाटीला मागेल पाडेल असा डान्स हा चिमुकला करताना दिसत आहे. त्याच्या अवती भोवती बसलेले प्रेक्षक त्याच्याकडे कौतुकाने पाहत आहे. व्हिडीओत पुढे मोठ्या स्क्रिनवर गौतमी पाटील सुद्धा डान्स करताना दिसत आहे. गौतमी पाटील सुद्धा स्टेजवरुन त्याला डान्स करण्यास प्रोत्साहन देताना दिसत आहे. नेहमी गौतमीच्या कार्यक्रमाला तिचीच चर्चा जास्त होते पण या कार्यक्रमात या चिमुकल्याची चर्चा जास्त होत आहे. या चिमुकल्यासमोर गौतमी पाटील फिकी पडेल, हे तितकेच खरे आहे.