लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीन नृत्य म्हणून लावणी सगळीकडे प्रसिद्ध आहे.सोशल मीडियावर लावणी करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका चिमुकलीचा सुद्धा लावणी करतानाचा सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चिमुकलीची लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली सुंदर लावणी करताना दिसत आहे. मी साताऱ्याची गुलछडी या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. तिने सुंदर नऊवारी नेसली आहे. नऊवारीत ती स्टेजवर लावणी सादर करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही तिचे चाहते व्हाल. सध्या या तुफान लावणीचा व्हिडीओ चांगलाचा चर्चेत आहे.