महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थीनीचा पाठलाग करून छेड काढण्याची घटना तारकपूर रस्त्यावर घडली. या विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तरूणावर तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगरात राहणार्या पीडिताने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
विद्यार्थीनी गुरूवारी (29 ऑगस्ट) नेहमी प्रमाणे सकाळी साडे नऊ वाजता महाविद्यालयात जाण्यासाठी हॉटेल थापरजवळून जात होती. त्यावेळेस पांढर्या रंगाची एक चार चाकी वाहन समोर उभे होते. सदर वाहना शेजारून जात असताना त्या वाहनाजवळ एक अनोळखी तरूण उभा होता. त्याने वाहनामध्ये बसण्याचा इशारा केला. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने डावा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले.
विद्यार्थीनीने घाबरून तेथून पळ काढून सुटका करून घेतली. त्यावेळेस सदर ठिकाणी दुचाकीवर दोन महिला जात असतांना त्यांनी सदर प्रकार पाहिला असता त्या मोठ्याने ओरडल्या. त्यांची दुचाकी थांबवून खाली ऊतरून त्यांनी त्या तरूणाला दगडे फेकून मारले. त्यामुळे तो तरूण घाबरून पळून गेला. ही घटना घरी आल्यावर कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.