Saturday, October 5, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील अवास्तव व्याज मागितल्याने सावकारावर गून्हा दाखल

अवास्तव व्याज मागितल्याने सावकारावर गून्हा दाखल
खर्डा येथील घटना

जामखेड – व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असतानाही अवास्तव व्याजाची मागणी करू लागल्याने व कोरे चेक घेणार्‍या सावकारावर खर्डा पोलीस स्टेशनला गुरनं 142/2024 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 308(1)351,352,(2)352(3) सह महाराष्ट्र सावकार अधिनियम 2014चे कलम39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बाजीराव मोहन बहादूरे रा. तेलंगशी ता जामखेड दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी अशोकराव रामहरी सुरवसे रा. धामणगाव ता जामखेड याच्याकडून ३ टक्के व्याजाने १लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याचे व्याज ४०,५००/रुपये दिले परंतु यातील सावकार आरोपी अशोक सुरवसे याने ३ ऐवजी ४ टक्के दराने आवास्तव व्याजाचे पैशाचे मागणी सुरू केली. त्यानंतर सावकाराने फिर्यादीकडून घेतलेल्या ब्लॅंक चेकचा वापर करून त्यावर १ लाख ३५ हजार रुपये अशी रक्कम टाकून यातील फिर्यादीने घराचा हप्ता भरण्यासाठी ठेवलेले पैसे आरोपीने परस्पर काढून घेतले तसेच आणखी अवास्तव व्याजाची मागणी करून छळ करत त्रास देऊ लागला. फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी घाबरून खर्डा पोलीस स्टेशनला धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरून अशोक सुरवसे या सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी विजय जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल पंडित हंबर्डे करीत आहेत.

अवैध सावकारकी करणे हे कायद्याने गुन्हा आहे,अवैध सावकारकी करणाऱ्यांनी अशा प्रकारे अवैध सावकारकी करून शेतकरी व गरीब लोकांचा छळ होत असेल तर अशा लोकांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन सपोनि विजय झंजाड यांनी केले आहे. त्यामुळे खर्डा व परिसरातील अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles