Monday, June 17, 2024

अहमदनगर जिल्ह्यात पोलिस हवालदारास लाच प्रकरणात गून्हा दाखल

लाच मागणी गुन्हा अहवाल

▶️ युनिट – अहमदनगर
▶️ तक्रारदार- पुरुष वय- 48 वर्ष, रा.टाकळीभन, ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर
▶️ आरोपी
आलोसे पांडुरंग बाबुराव वीर, पो.हे.कॉ./925, वर्ग-3 नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन, जि.अहमदनगर
▶️ लाचेची मागणी- 5000 ते 10,000/-₹
▶️ लाचेची मागणी दिनांक- 12/03/2024
▶️ लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे विरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशी वरून तक्रारदार यांचे विरुध्द कारवाई न करण्यासाठी यातील आलोसे हे लाच मागणी करत असले बाबत ची तक्रार दि.11/03/2024 रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कडे प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीवरून दि.12/03/2024 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे वीर यांनी तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी इतर पोलिसाने पाच-दहा हजार रुपये घेतले असते,द्यायचे तुमच्या मनाने, हिशोबा हिशोबाने द्या, असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 31/05/2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
▶️ हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी:-
श्री.शरद गोर्डे,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. अहमदनगर

▶️ सहायक सापळा अधिकारी
श्रीमती छाया देवरे,
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि.अहमदनगर

▶️ पर्यवेक्षण अधिकारी*
श्री.प्रवीण लोखंडे,
पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि,अहमदनगर
•••••••••••••••••••••••-
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- 0241- 2423677
*@ टोल फ्रि क्रं.1064 *

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles