माणसाला आजारी असताना अशक्तपणा आल्यास त्याला सलाईन लावले जाते. सलाईनमुळे पोटात अन्न नसले तरी व्यक्ती काही दिवस आणखी जगू शकतात. अशात एका तरुणाने थेट आपल्या पुस्तकांना सलाईन लावलं आहे. परीक्षेचा अभ्यास न झाल्याने त्याने असा जुगाड शोधून काढला आहे. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आजपासून दहावीच्या परीक्षांना देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर परीक्षेबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील अनेक व्हिडीओमध्ये विद्यार्थी परीक्षेला कॉपी कसे करतात हे दाखवण्यात आलं आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे ईमोजी पाठवले आहेत.
Video: परीक्षेच्या एक दिवस आधी पुस्तकांना लावलं सलाईन,विद्यार्थ्याचा जुगाड
- Advertisement -