वाहन रस्त्यावर चालवणे अतिशय जबाबदारीचे काम आहे आणि त्यात तुमची एखादी चूक तुमच्या किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. अनेक वेळा थकव्यामुळे किंवा अपूर्ण झोप आदी बऱ्याच कारणांमुळे गाडी चालवताना झोप लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. तर आज सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रवासादरम्यान वाहनचालकाला झोप येते आणि तो झोपेत ट्रक चालवताना दिसतोय आणि गाडीचा अपघात होतो; जे पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल.
व्हायरल व्हिडीओ एका ट्रकचा आहे. ट्रकमध्ये चार कामगार बसलेले आहेत. त्यातील एक जण ट्रकचालक असतो. ट्रकमधील चार कामगारांपैकी एकाने सीटबेल्ट लावलेला नसतो. ट्रकचालकाबरोबर असणारे तीन कामगार गाडीत झोपलेले असतात; तर प्रवासादरम्यान ट्रक चालवणाऱ्याला चालकालासुद्धा झोप लागते आणि काही वेळ चालक तसाच झोपेत ट्रक चालवत असतो आणि काही वेळात त्याला जाग येते, तेव्हा ट्रकवरचा त्याचा कंट्रोल सुटून अपघात होतो आणि ट्रकमधील उपस्थित सगळेच जण त्यांच्या जागेवरून उडून ट्रकमध्ये इकडे तिकडे आपटताना दिसतात. कशाप्रकारे अपघात झाला, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
Bro was sleep driving.. pic.twitter.com/uVrivkFWuz
— CCTV IDIOTS (@cctvidiots) October 19, 2023