कोपरगाव : माझ्या डोक्यावर कर्ज झाले असल्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये तयार करून विहिरीत उडी घेऊन शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २२)दुपारी कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी येथे घडली. हिंगणी बंधाराजवळील विहिरीत सोमनाथ खंडू कदम (वय ४३, रा. धारणगाव कुंभारी, ता. कोपरगाव) येथील शेतमजुराने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ काढून नंतर विहिरीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. गावकरी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सोमनाथ खंडू कदम यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.