धनाचे दर वाढल्यामुळे डिझेलसाठी शेतकऱ्यांना खूप पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे ट्रॅक्टर वापरणं परवडत नाही. एका शेतकऱ्याने डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यासाठी एक अप्रतिम जुगाड केला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘गरज ही शोधाची जननी आहे’ असं म्हटलं जातं, याचेच उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कारण एका शेतकऱ्याने डिझेलवर ट्रॅक्टर चालवून शेतीमधील कामं करणं परवडत नसल्यामुळे त्याने चक्क सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर बनवला आहे. शेतकऱ्याच्या या जुगाडू ट्रॅक्टरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @IndianFarmer_) नावाच्या अकाउंटवरून शेर केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “हा ट्रॅक्टर ना पेट्रोलवर चालतो ना डिझेलवर… शेतकऱ्याने बनवला आहे असा जुगाड, समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.”
ये ट्रैक्टर🚜न तो पेट्रोल से चलता है और न ही डीजल से…किसान ने बनाया है ऐसा जुगाड़, जानकर उड़ जाएंगे आपके होश😱💯 #indianfarmer #jugaad pic.twitter.com/Ja1aLBQl7F
— Indian Farmer (@IndianFarmer_) September 17, 2023