सुपा, पारनेर, बेलवंडी व एमआयडीसी हद्दीत दरोडयाचे गुन्हे करणारी टोळी निष्पन्न दरोडयाच्या टोळीतील 2 आरोपी मुद्देमालासह जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 25/01/2025 रोजी रात्री 02.00 वा.सुमारास फिर्यादी नामे योगेश खंडू शेरकर, वय 30, रा.सोबलेवाडी, पठार वस्ती, ता.पारनेर यांचे राहते घराचे अज्ञात आरोपीतांनी प्रवेश करून, फिर्यादी व त्यांचे आईस मारहाण केली. घरातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोटार सायकल जबरीने चोरून नेली.याबाबत पारनेर पोलीस ठाणे गु.र.नं. 63/2025 बीएनएस कलम 309 (6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्हयातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक नेमुण कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/थोरात व पोलीस अंमलदार फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व महादेव भांड अशांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 05/02/2025 रोजी पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा केलेले आरोपी हे टीव्हीएस व डीलक्स मोटार सायकलवर कान्हुर रोडने पारनेच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पारनेर ते कान्हुर पठार रोडवर सापळा लावून संशयीत वाहनावरील इसमांना ताब्यात घेतले. त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सिध्देश सादीश काळे, वय 22, रा.वाळुंज पारगाव, ता.अहिल्यानगर 2) श्रीहरी हरदास चव्हाण, वय 25, रा.वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीची पंचासमक्ष आरोपी सिध्देश सादीश काळे याचे ताब्यातुन 50,000/- रू किंमतीची एमएच-16-सीझेड-6818 टीव्हीएस कंपनीची मोटार सायकल व आरोपी श्रीहरी हरदास चव्हाण याचे ताब्यातुन 50,000/- रू किंमतीची एचएफ डीलक्स कंपनीची मोटार सायकल असा एकुण 1,00,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पथकाने ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस केली असता दिलेल्या माहितीवरून पारनेर, भिंगार कॅम्प, सुपा, बेलवंडी व एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयांची पडताळणी करून खालीलप्रमाणे 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ताब्यातील इसमांना गुन्हयांतील सोन्याचे दागीने व रोख रक्कमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या वाटयाला मिळालेले सोन्याचे दागीने महिला नामे काजल अजय भोसले, रा.वाळुंज, ता.अहिल्यानगर हिने विक्री केले असल्याचे सांगीतले आहे.






