मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नगरच्या शांतता रॅलीत घुसलेल्या चोरट्यांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी लाखोंच्या मुद्देमालसह केले जेरबंद
अहमदनगर दि.१३ ऑगस्ट):-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून खूप मोठा लढा उभा केला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे हे शांतता रॅली करत आहे.जरांगे यांची ही शांतता रॅली सोमवारी अहमदनगर शहरात दाखल झाली असता या रॅली मध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या १४ आरोपींच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.या १४ चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जागोजागी निघणाऱ्या या रॅलीला मराठा समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून लाखोंच्या संख्येत गर्दी होत आहे.या गर्दीचा फायदा घेत चोरटे अनेकांचे खिसे कापत असल्याचा प्रकार घडत आहे.मात्र अहमदनगर मध्ये निघालेल्या रॅलीदरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या सतर्कतेने १४ चोट्यांना अटक करण्यात आली. या चोरट्यांकडून पोलिसांनी एक चारचाकी,वाहन,एक दुचाकी वाहन,७ मोबाईल फोन यासह रोख रक्कम असा एकूण ६ लाख ५० हजरांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ/योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे,पोकॉ/ सूर्यकांत डाके,विशाल दळवी,सलीम शेख, अभय कदम,पोना/अविनाश वाकचौरे,अमोल गाडे,अतुल काजळे, अनुप झाडबुके,सतीश शिंदे,सत्यम शिंदे, व मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे