सोशल मीडियावर यावरून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली १५०० रुपये दिल्यानंतर सुद्धा महिला सरकारचं काहीच ऐकणार नाही, यामागील कारण सांगताना दिसते. ती चिमुकली काय सांगते, यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकली सांगते, “इथे आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं काहीही ऐकत नाही.. आणि इथं सरकारला वाटतंय की १५०० रुपयांमध्ये त्यांचं ऐकेल. ना बाबा ना.. कठीण आहे.” चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.