Monday, April 22, 2024

अहमदनगरमधील १२ वी चा पेपर द्यायला गेलेल्या मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण

नगर तालुक्यातील दौंड रोड वरील एका गावातून १२ वी परीक्षेचा पेपर देण्यासाठी नगर शहरातील दिल्ली गेट पासून जवळच असलेल्या एका नामांकित कॉलेज मध्ये गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत तिच्या वडिलांनी सोमवारी (दि.२६) दुपारी नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरची १७ वर्षीय मुलगी १२ चा पेपर देण्यासाठी नगर तालुक्यातील दौंड रोड वरील एका गावातून शुक्रवारी (दि.२३) नगर मध्ये आली होती. त्या दिवशी रात्री १० च्या सुमारास तिने वडिलांना फोन करून मी मैत्रिणीकडे होस्टेल वरच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा तिचा संपर्क झाला नाही.

तिचा तिच्या कुटुंबीयांनी मैत्रिणी तसेच नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र तिची काहीच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाची तरी फुस लावून पळवून नेले असल्याचा संशय तिच्या वडिलांना आला. त्यानंतर सोमवारी (दि.२६) दुपारी नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द भा.दं.वि.कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles