उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही शुभ कार्य असो, किंवा लग्न असो किंवा हळदी कुंकूचा कार्यक्रम, उखाणे हे आवर्जून विचारले जातात. लबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, यालाच उखाणा म्हणतात. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेतात. उखाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात की पाहून पोट धरून हसायला येते.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क नवरदेव नवरीसाठी उखाणा घेत आहे. नवरदेवाचा उखाणा ऐकून कोणीही थक्क होईल
हा व्हायरल व्हिडीओ गृहप्रवेशाच्या वेळीचा आहे. व्हिडीओमध्ये नवरदेव पत्नीसाठी उखाणा घेताना दिसत आहे. नवविवाहित जोडप्याच्या आजुबाजूला नातेवाईक सुद्धा जमलेले दिसत आहे. नवरदेव उखाणा घेतो, “जिम करणारी बायको मिळाली, डाएटचं आता टेन्शन मिटलं, आम्ही खाणार प्रोटीन आणि पनीर, बाकीच्यांनी खावं भाकरी आणि पिठलं” हा उखाणा ऐकून नवरीला हसू आवरत नाही आणि तिच्याबरोबर नातेवाईक सुद्धा हसताना दिसतात. जीमप्रेमी लोकांना हा व्हिडीओ खूप आवडेल.