लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. लग्नाचा दिवस सर्वांच्या लक्षात राहण्यासाठी प्रत्येकजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतो.अनेकजण लाखोंचा खर्च करतात तर काहीजण लग्नाचे ठिकाण हटके निवडतात. मात्र सोशल मीडिया दोन व्यक्तींना स्वत:चे लग्न हटके बनवण्याच्या नादात थेट पोलीस ठाण्यात जावे लागले आहे. मात्र सध्या या व्यक्तींनी केलेल्या जूगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जिथे दोन भांवानी त्यांचे लग्न सर्वांपेक्षा हटके होण्यासाठी तसेच लग्नाच्या मिरवणुकीत या वाहनाला घेऊन जायचे होते आणि त्यांच्या नववधूंना घरी आणायचे होते, जेणेकरून त्यांचे लग्न वेगळे व्हावे म्हणून त्यांनी चक्क जुन्या गाडीचे हेलिकॉप्टरमध्ये रुपांतर केले आहे. मात्र हे नियमानुसार असल्याने पोलिसांनी त्याच्या या वाहनाला जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टर वाहनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Video: लग्नाच्या वरातीसाठी भावांचा हटके जुगाड, कारपासून बनवलं हेलिकॉप्टर
- Advertisement -