Thursday, July 25, 2024

सिंहाचा जीव धोक्यात; पाणघोड्याचा सिंहाच्या कळपावर हल्ला; थरकाप उडविणारा व्हिडीओ

सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी जंगलातील इतर प्राण्यांवर अनेकदा हल्ला करताना दिसतात. त्यामुळे इतर प्राणी नेहमीच त्यांना घाबरून असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता; ज्यात सिंहाच्या दोन शावकांनी एका पाणघोड्यावर भयानक हल्ला केला होता. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे; ज्यात एक पाणघोडा सिंहावर हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका नदीमध्ये तीन सिंह पोहण्याचा आनंद घेत आहेत. यावेळी अचानक एक पाणघोडा तिथे येतो आणि त्यातील एका सिंहावर हल्ला करतो. यावेळी तो सिंह स्वतःला पाणघोड्याच्या तावडीतून सोडवून घेऊन पळून जातो. यावेळी पाणघोड्याला पाहताच उर्वरित दोन सिंहदेखील दूर पळून जातात.

https://x.com/AMAZlNGNATURE/status/1805695151756456042?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1805695151756456042%7Ctwgr%5Ef592e91e5ff9ede239de23b95316f89ecd6627c1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fviral-video-a-hippo-attacks-a-herd-of-lions-after-watching-the-shocking-video-netizens-said-the-real-king-of-the-jungle-sap-20-4455487%2F

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles