Thursday, May 22, 2025

Ahmednagar crime :खुनाचा प्रयत्न करणारे 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

Ahmednagar crime चांदगांव, ता. शेवगांव येथील शेतातील रस्त्याचे कारणावरुन, खुनाचा प्रयत्न करणारे 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 13 जुलै, 2024 रोजी फिर्यादी श्री. गोपीचंद अश्रु पोपळे वय 65, रा. बेलगांव, ता. शेवगांव हे त्यांची पत्नी व मुलगा असे त्यांचे शेतामध्ये खताची गाडी येण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करतांना इसम नामे रामदास गायके व इतर 5 अशांनी संगनमत करुन तुम्ही रस्त्यात खड्डे का करता व आमच्या शेतात पाणी सोडल्याने आमचे शेताचे नुकसान होते असे म्हणुन हातातील कु-हाड, लाकडी दांडके, काठ्या व कोयता घेवुन फिर्यादी व त्यांचे कुटूंबियांना जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केले बाबत शेवगांव पो.स्टे.गु.र.नं. 599/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), 189 (2), 191 (2), 193 (3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरची घटना घडल्या पासुन यातील आरोपी हे फरार झाले होते.
यातील आरोपी फरार असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन, आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोहेकॉ/संतोष लोढे, पोना/फुरकान शेख, पोकॉ/रविंद्र घुगांसे, जालींदर माने, मयुर गायकवाड व चापोहेकॉ/ उध्दव टेकाळे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी आवश्यक सुचना देवुन रवाना केले. पथक तांत्रिक विश्लेषण व गुप्तबातमीदारा मार्फत फरार आरोपींची माहिती घेत असतांना, दिनांक 02/08/24 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी नामे महादेव गायके व गणेश गायके हे पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर कारखाना परिसरात आले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, पथकाने लागलीच वृध्देश्वर कारखाना, ता. पाथर्डी परिसरात जावुन फरार आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांनी नावे 1) महादेव अंकुश गायके वय 20 व 2) गणेश जालींदर गायके वय 19 दोन्ही रा. बेलगांव, ता. शेवगांव असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता दोन्ही आरोपींनी शेतातील रस्त्याचे कारणावरुन मारहाण केल्याचे सांगितल्याने त्यांना शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. सुनील पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles