अहमदनगर : अतिक्रमण काढण्यावरून शहरात मोठा राडा
अतिक्रमण धारकांनी घातला गोंधळ ; पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल
प्रतिनिधी – विक्रम लोखंडे
अतिक्रमण काढण्यावरून शहरात मोठा राडा झाला, शहरातील कायनेटिक चौक परिसरातील सीडी लॉ कॉलेज परिसरातील अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांनी विरोध दर्शवत गोंधळ निर्माण केला.अहमदनगरचे जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यात येत असताना नागरिकांनी वाद घालत ,विरोध दर्शवत, jcb अडवत राडा घातला. यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
यावेळी तहसीलदार संजय शिंदे, अन्न धान्य वितरण अधिकारी अर्चना पागिरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता.