सावेडीतील मोठ्या व्यापारी संकुलाला आग
नगर : सावेडी उपनगरातील नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या कोहिनूर मॉल परिसरातील एका मोठ्या व्यापारी संकुलाला आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली हे अजून समजले नसल्याचे महापालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.