Monday, December 4, 2023

नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार,युवक अटकेत

अहमदनगर -नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या अल्पवयीन (वय 12) मुलीस पळवुन नेवुन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दरम्यान, मुलीच्या आईने तोफखाना पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी मुलीची सुटका करून अत्याचार करणार्‍या युवकाला ताब्यात घेत अटक केली आहे. सोहेल ऊर्फ सोएब शफीमहंमद शेख (वय 20 रा. सिव्हिल हाडको) असे त्याचे नाव आहे.

मुळच्या उत्तर प्रदेश व सध्या नगर शहरात राहणार्‍या फिर्यादी यांची मुलगी बुधवारी (दि. 1) दुपारी किराणा दुकानात जाऊन येते, असे सांगून गेली असता तिला युवकाने पळवून नेले होते. मुलीचा शोध न लागल्याने आईने तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुरूवातीला भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला व मुलीचा शोध सुरू केला.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, संदीप धामणे, सचिन जगताप, अविनाश वाकचौरे, सुरज वाबळे, संदीप गिर्‍हे, गौतम सातपुते, सतीष त्रिभुवन, सतीष भवर यांच्या पथकाने मुलीचा शोध घेतला असता मुलगी सोहेल ऊर्फ सोएब शफीमहंमद शेख याच्यासह मिळून आली. त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलीच्या जबाबावरून सोहेल ऊर्फ सोएब शफीमहंमद शेख याच्या विरूध्द वाढीव अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक रणशेवरे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: