Saturday, October 12, 2024

नगर शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलत्कार करणाऱ्या नराधमास कोतवाली पोलीसांनी ठोकल्या बेडया

दिनांक २७/०९/२०२४ रोजी पिडीत मुलीच्या आईने कोतवाली पोलीसांना माहिती दिली की, तिचे अल्पवयीन मुलीचे कुणीतरी अपहरण केले आहे. यातील अल्पवयीन फिर्यादी ही दिनांक २६/०९/२०२४ रोजी दुपारी १२.३० वा सुमारास बुरुडगाव रोड अहमदनगर येथे अभ्यासा विषयी झेरॉक्स काढण्यासाठी कॉलेज च्या बाहेर आली असता यातील आरोपी चेतन संतोष सरोदे रा. गांधी नगर बोल्हेगाव, ता. जि. अहमदनगर हा दुचाकी वर फिर्यादीच्या पाठीमागुन आला व फिर्यादीस म्हणाला की तु आताच्या आता माझ्या सोबत चल त्यावरुन फि मजकुर ही तुझा व माझा काही एक संबधं नाही तु मला त्रास देऊ नको असे म्हणाले नंतर आरोपीने फि शिवीगाळ करुन फिर्यादीस बळजबरीने गाडीवर बसवुन गांधी नगर बोल्हेगाव येथे असलेल्या रुम मध्ये घेऊन जावुन फिर्यादीस लाथा बुक्याने मारहारण करुन फिर्यादीस बळजबरीने शाररीक संभोग केला. तसेच तु कोणाला सांगितले तर तुझे फोटो तुझ्या घरी व कॉलेज मध्ये व्हायरल करेल व तुला जीवे मारेल अशी धमकी दिली वैगेरे मजकुराची फिर्याद दाखल झाल्याने पो.नि. श्री दराडे सो यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हेशोध पथकास सदर गुन्हयाबाबत माहिती देवून आरोपी व पिडीत मुलीचा शोध घेण्याबाबत सुचना देवुन पथक रवाना केले.

सदर गुन्हयाचा तपास हा तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या माहिती वरुन सदर पथकाने मुलीचा काही तासातच शोध घेवुन आरोपी नामे चेतन संतोष सरोदे रा. गांधी नगर बोल्हेगाव, ता. जि. अहमदनगर यास त्याचे मामाचे गावी मु.पो. भानसहिवरा ता. नेवासा जि. अहमदनगर येथुन ताब्यात घेवुन सदर मुलीची सुटका केली व त्यानंतर सदर मुलीने तिच्या आई समक्ष कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं १०६६/२०२४ बी.एन.एस. २०२३ चे कलम ७८,६४,१३७ (२) ११५ (२) ३५१ (२) ३५२ सह बाल लैगिंक अत्याचार सरंक्षण अधि नियम २०१२ चे कलम ४ ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास म.पो.स.ई शितल मुगडे हया करीत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल भारती सो यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, म.स.पो.नि योगिता कोकाटे, म.पो.स.ई. शितल मुगडे गुन्हे शोध पथकाचे म.पो.हे. कॉ रोहिणी दरंदले पो.हे.कॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सुर्यकांत डाके, पो.कॉ अमोल गाढे, अभय कदम, सतीश शिंदे अतुल काजळे मपोकों सोनल भागवत व दक्षिण मोबाईल सेल चे पो.कॉ राहुल गुंडू यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles