Tuesday, April 23, 2024

दहावीचा पेपर देऊन घरी जात असताना अल्पवयीन अत्याचार, अहमदनगर शहरातील घटना

अहमदनगर : दहावीचा पेपर देऊन घरी जात असताना १५ वर्षीय मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवित लॉजवर नेऊन अत्याचार करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. १८) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. अरबाज चांदरखान पिंजारी (रा.भिंगार, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मुलीचा शाळेपासून रिक्षा स्टॉपपर्यंत पाठलाग करत असे. तू जर मला भेटली नाहीस, तर आपले प्रेमसंबंध आहेत, अशी खोटी माहिती तुझ्या घरच्यांना देईल, अशी धमकी देत २५ फेब्रुवारी रोजी त्याने पीडितेला दिली. त्याने लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीचा सोमवारी दहावीचा पेपर होता. ती पेपर देऊन घरी जात होती. तेव्हा आरोपीने पीडितेचा पाठलाग करुन १८ मार्चला दुसऱ्यांदा अत्याचार केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles