Saturday, October 5, 2024

कोल्हापुरात अहमदनगरच्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर जमावाची दगडफेक,पोलीस घटनास्थळी दाखल

नगरहून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्याच्या एस. टी.बसवर कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे दगडफेक झाल्याची घटना बुधवारी (दि.३१) सायंकाळी घडली आहे. या बसमध्ये नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहलीला गेलेले होते. या दगडफेकीत एक दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून ते सर्व सुखरूप असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

दरम्यान दगडफेक झाल्यानंतर जमाव पसार झाला. सहलीच्या बसवर दगडफेक झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.काही अज्ञातांकडूनी ही दगडफेक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोल्हापूर शहरात सकाळपासून एका मदरशाच्या अतिक्रमणच्या मुद्द्यावरुन गोंधळ सुरू होता. त्यात संध्याकाळी वाहनांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला.

कोल्हापूरमध्ये सध्या अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी येत आहे. तसेच शाळेच्या सहलीदेखील कोल्हापुरात येत आहेत. या सर्व भाविक आणि पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दसरा चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या सोनेवाडी (ता.नगर) येथील शाळेच्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्याचबरोबर आणखी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नेमकी घटना काय झाली आहे, दगडफेक का झाली, कोणी केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles