एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा कशाचीही चिंता न करता मनसोक्त लावणीच्या तालावर थिरकताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन आजोबा कशाचीही तमा न बाळगात स्टेजवर सुरु असलेल्या लावणीबरोबरच ठेका धरत प्रेक्षकांमध्ये नाचत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.