Tuesday, February 18, 2025

अहमदनगर करंजी घाटात अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

कल्याण निर्मळ राष्ट्रीय मार्गावरील करंजी घाटामध्ये माणिकशहा पिरबाबा दर्गा जवळील धोकादायक वळणा जवळ एका वीस फूट खोल दरीमध्ये अंदाजे वय 35 वर्ष असलेल्या एका अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

करंजी घाटामध्ये एका पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला असल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्यासह पोलीस उपधीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक लिमकर, जगदीश मुलगीर, विलास जाधव यांच्यासह करंजी पोलीस चौकीचे हवालदार दळवी, कुसळकर, बेरड, बुचकूल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मयत व्यक्तीचा मृतदेह खोल दरीतून वरती काढण्यात आल्यानंतर या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला आढळला. हा घातपाताचा प्रकार आहे की काय? त्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करणार आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. करंजी घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles