मुलाने संपत्तीसाठी काढल आई-वडिलांना घराबाहेर
नगर -संपत्ती नावावर करून देण्यासाठी आई-वडिलांना मुलगा व सुनेने धक्काबुक्की करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना माळीवाडा भागात घडली.
पंडित नारायण खरपुडे (वय ६९) व त्यांच्या पत्नी (दोघे रा. विशाल गणपती मंदिरासमोर, माळीवाडा) यांना घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी पंडित
खरपुडे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा व सूनेविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगा नीलेश पंडित खरपुडे व सून करिष्मा नीलेश खरपुडे (दोघे रा. संदीपनगर,सारसनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. १० मे रोजी सायंकाळी सात वाजता फिर्यादी व त्यांच्या पत्नी सारसनगर येथील घरी असताना मुलगा व सूनेने त्यांना शिवीगाळ व अपमानीत करून तुम्ही येथे राहायचे नाही, असे म्हणून त्यांच्याच घरातून हाकलून दिले. तसेच, २० मे रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी त्यांच्या माळीवाडा येथील वडिलोपार्जित घरी राहत असताना मुलगा नीलेशने त्यांना धक्काबुक्की केली. सून करिष्माने फोन करून सासूला शिवीगाळ केली. तुमची संपत्ती आमच्या नावावर करा, नाही तर तुमची वरात काढीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.