Sunday, September 15, 2024

शेवगाव तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत दोन महिलांसह चार जण गंभीर जखमी, लाखोंचा ऐवज लंपास

अहमदनगर-शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोधेगाव, शेकटे खुर्द आदी भागात दरोडेखोरांनी तीन-चार ठिकाणी रात्रभर वाडीवस्तीवर धुमाकूळ घातला. धारदार शस्त्राने मारहाण करत ४ जण गंभीर जखमी करून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम लंपास केली आहे. दरोडेखोरांची मोठी दहशत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शेकटे खुर्द येथे बुधवारी रात्री सुनिल रावसाहेब राठोड हे त्यांची पत्नीसह बाळूबाई तांड्यावरून चिकणी तांडा बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास जात असताना दरोडेखोरांनी रस्त्यावर अडवून दहशत करीत दोघांना जबर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र आदी दाखिने लंपास केली. त्यात राठोड दापत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती बोधेगाव दूरक्षेत्राचे पोलीस नाईक ईश्वर गर्जे यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मात्र दरोडेखोर पसार झाले.

या घटनेपाठोपाठ बोधेगाव शिवारातील गोळेगाव रोड लगत आघाव वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला चढविला. आघाव कुटुंबातील घरात झोपलेल्या हातपाय बांधून कोंडले तर लगत पडवीत झोपल्या व्यक्तीकडे मोर्चा वळवून धारदार शस्त्र व कुऱ्हाडीने जबर मारहाण करून महिलेच्या गळ्यातील सोने चांदीचे दागदागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. झालेल्या हल्यात बाळू बाबुराव आघाव व संगीता बाळू आघाव गंभीर जखमी झाले आहेत. संगिता आघाव यांच्यावर कुऱ्हाडी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याने दोघांनाही अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

त्याच बरोबर या दरोडेखोरांनी बोधेगाव परिसरातील काकासाहेब मिसाळ यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण इतर घडलेल्या घटनेची माहिती झाल्याने मिसाळ कुटुंब जागे असल्याने दरोडेखोरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर लाडजळगाव येथे एका ठिकाणी हल्ला केला आहे. त्यामध्ये एक जण जखमी आहे असून त्यावर शेवगाव येथे उपचार सुरू आहेत.

तसेच बोधेगाव, लाडजळगाव, गोळेगाव, आदी भागात वाडी वस्तीवर रात्र भर हैदोस घातला आहे. बोधेगाव येथील अकोलकर वस्तीवर नागरिक घटनेची माहिती मिळाल्याने रस्त्यावर जागे होते. पैठण-पंढरपूर पालखी मार्गावरून दरोडेखोर पलायन करत असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी मोटारसायकल जागेवर सोडून शेतात पलायन केले.

तसेच अनेक ठिकाणी काही वेळेच्या अंतराने चोरट्यांचा प्रताप सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी ईश्वर गर्जे यांनी तत्काळ माहिती वरिष्ठांना देताच शेवगाव पोलीस ठाण्यात नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक समाधान नांगरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

घटनेची माहिती घेत दरोडेखोरांचा तपास सुरू केला असून आज (गुरुवार) सकाळी ठसे तज्ञ, श्वान पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दाखल होऊन घटनेची माहिती तपासाची सूत्र हलविले आहेत. या घटनेमुळे बोधेगाव परिसरात मोठी घबराट निर्माण होऊन दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली आहे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी ईश्वर गर्जे यांनी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बोधेगाव भागात दरोडेखोर आले आहेत नागरिकांनी दक्षता घ्यावी अशी माहिती ग्रामरक्षक हेल्पलाईन गृपवर माहिती दिल्याने बोधेगाव भागातील नागरिक जागे होऊन घटनेची माहिती इतरांना मोबाईलवर दिली गेली. तसेच पोलिसांच्या सतर्कतेमुळे नागरिक जागे होऊन रात्रभर जागून काढली. त्यामुळे पुढील काही चोरीच्या घटनेचा अनर्थ टळला गेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles