Monday, March 4, 2024

अहमदनगर रेव्हेन्यू सोसायटीच्या समृद्धी विकास पॅनलचा दणदणीत विजय

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेव्हेन्यू अँण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हन्मेंट को-ऑप.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी ९६ टक्के मतदान झाले. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. रेव्हेन्यू अँण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हन्मेंट को-ऑप. सोसायटीचे जिल्ह्यात सुमारे १०४२ सभासद आहेत. यात महसूल कर्मचारी, तलाठी, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी सभासद २०२४-२९ या पंचवार्षिक कालावधीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली, एकता पॅनल विरुद्ध समृद्धी पॅनलमध्ये ही लढत होती. यामध्ये समृद्धी विकास पॅनल चा एक हाती दणदणीत विजय झाला. सर्वसाधारण मध्ये गणेश गर्कळ, राजेश घोरपडे, प्रदीप चव्हाण, संदीप तरटे, बाबासाहेब दातखिळे, प्रवीण बोरुडे, संतोष मांडगे, सुरेश राऊत, हरिभाऊ सानप, विजय हरिश्चंदे, व अनुसूचित जाती जमाती मध्ये प्रदीप अवचर, महिला प्रतिनिधी वृषाली करोसिया, सुनंदा मरकड, इतर मागासवर्गीय मध्ये सनी जाधव व भटक्या विमुक्त विकास मोराळे यांचा दणदणीत विजय होऊन समृद्धी विकास पॅनलला एक हाती सत्ता मिळाली यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण करत ढोल च्या तालावर करण्यात आले..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles