सध्या दैनंदिन वापरातल्या वस्तू खरेदी करण्यापासून ते महागड्या वस्तू विकत घेणे असो, सर्व आपल्याला ऑनलान मिळते. ऑनलाइन असल्याने वस्तू घरी बसल्या आपल्याला घरच्या घरी मिळतात शिवाय व्यक्तीचा वेळ वाचला जातो.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,ज्यात आपल्याला आधुनिकीरणाचे फायदे कसे मिळतात,याचे व्हिडिओ पाहायला मिळतात.
जग बदल्याने आपल्याला आता घरचे जेवण बनवण्यापासून ते घराची साफसफाई करण्यापर्यंत अनेक अॅप उपलब्ध झाले आहेत.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असा आहे,ज्यात चक्क मोटरसायकलवर चालते फिरते सलूनचे दुकान सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.