अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींच्या अंगात सैतान आहे, तो काढावा लागेल असं सांगत त्यांना धर्मस्थळी बोलावून गेल्या एक महिन्यापासून अत्याचार केला जात असल्याची खळबळजनक घटना सोनई गावाजवळ घडली आहे. पाचवीत शिकणाऱ्या मुलींना अत्याचाराची वाच्यता जर केली तर त्यांची आई आणि आजी मरून जाईल अशी भीती घालण्यात आली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे.
नेवासा तालुक्यातील सोनई येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. सोनई गावाजवळील चर्चच्या पास्टरने गरीब कुटुंबाच्या असहाय्यतेचा फायदा घेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. तुमच्या कुटुंबातील मुलींमध्ये असलेल्या सैतानामुळे संकट आले आहे. त्यामुळे त्यांना धार्मिकस्थळी पाठवा असं सांगण्यात आलं. गेल्या एका महिन्यापासून अगदी पाचवीत शिकणाऱ्या 10 वर्षीय दोन मुलींवर भीती दाखवत अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम वैरागर, संजय वैरागर आणी सुनील गंगावणे या तिघांच्या विरोधात सोनई पोलीस पोलीस ठाण्यात भादवी कलम 376,354,34 यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना जेरबंद करण्यात आलं आहे. ही घटना अतिशय गंभीर असून आणखी कोणी पीडित असतील तर त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आहे. या प्रकरणाचा तपास अहमदनगर पोलीस करत आहेत.






